पुन्हा जागा बळकावल्यास गुन्हा दाखल करू : पी शिवशंकर
सोलापुर – यल्ललिंग बहुउद्देशीय रेसिडेसियल सोसायटी येथील मंजुर लेआऊटमधील ओपन स्पेस प्लॉट नं . २९अ / ७ / ११ या जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले होते. कोर्टाच्या निकालावरून आयुक्त यांनी 5 फेब्रुवारी रोजी तेथील अतिक्रमण काढण्यात आले होते. या ओपन स्पेस वरील प्रलंबित चिल्ड्रन पार्क गार्डन विषयी आयुक्त पी.शिवशंकर यांनी जागेवर जाऊन तेथे पाहणी केली.
त्यभागतील रहिवाशां करिता ऑक्सीजनसाठी झाडांची आवश्यकता असल्याने प्रलंबित चिल्ड्रल पार्क गार्डन लवकरात लवकर तयार करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी आपल्या निधीतून जो निधी लागेल तो मी द्यायला तयार आहे आयुक्तांनी आता मंजुरी दिली आहे कोणी यापुढे देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे अशी माहिती नगरसेवक नागेश वल्याळ यांनी दिली. यावेळी प्रभाकर यादगिरी, किरण भंडारी, नागेश शिरूर, विनायक साखरे, चंद्रकांत गलपल्ली, बसवराज बरदेपुर, गिरीधर शंकू, मनोज साळुंखे, महेश ठाकरे, सुनील दत्त थोरात, लक्ष्मीकांत बिराजदार आदी सदस्य उपस्थित होते.