सोलापूर : तुळजापूर वेस येथील गोल तालीम अत्याधुनिक पद्धतीने उभी करण्याकरिता प्रयत्न केले जातील असे अभिवचन आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले.सोलापूर शहरातील नावाजलेली आणि ब्रिटिश कालीन असलेल्या गोल तालमीच्या नूतनीकरणाचा समारंभ प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख हे बोलत होते. सभागृहनेते शिवानंद पाटील,नगरसेवक संजय कोळी,नगरसेवक श्रीनिवास करली,नगरसेवक अमित पाटील,संजय कणके,राजू पाटील,परिवहन सभपती जय साळुंखे,गोपाल झंवर,बाबुराव वर्मा,गोपाल सोमाणी,रुपेश करपेकर, सैदप्पा शिंदे,राहुल रणदिवे उपस्थित होते.
आजच्या तरुणांना व्यायामाची सवय लागावी याकरता पडझड झालेली तालीम नव्या जोमाने बांधण्याकरता कोणत्या कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागले हे सांगत असताना बोल तालमीचे सर्वेसर्वा राहुल रणदिवे यांच्या भावना दाटून आल्या. स्वखर्चाने तालमीचे नूतनीकरण करून माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी बोलताना म्हणाले.आजच्या तरुणांमधील व्यसनाधीनता पाहून तरुणांनी अंग मेहनतीच्या कामाकडे वळणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत गोल तालमीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.