• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सिताफळ संशोधक डॉ. नवनाथ कसपटे यांची फसवणूक केल्याबाबत पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद

by Yes News Marathi
June 28, 2021
in इतर घडामोडी
0
सिताफळ संशोधक डॉ. नवनाथ कसपटे यांची फसवणूक केल्याबाबत पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : भारत देशातील एकमेव नोंदणीकृत असलेले सिताफळाचे वाण एन एम के १ गोल्डन या वाणाच्या नोंदणीबाबत पीक वाण नोंदणी निबंधक कार्यालय नवी दिल्ली येथे मयत व्यक्तीच्या नावाने बनावट व बोगस सिताफळ विक्रीच्या पावत्या दाखवून तसेच मौजे वाणेवाडी तालुका बार्शी येथील शेतीच्या सात बारा उताऱ्यावर खाडाखोड करून बोगस सीताफळ बागेच्या नोंदी पीक नोंदणी सदरात लिहून बनावटीकरण करून खरे आहेत असे भासवून फसवणूक केल्याबाबत रमाकांत बजरंग यादव मौजे वाणेवाडी,तालुका बार्शी; सध्या राहणार मौजे आसरे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, गोपीनाथ महादेव गरदडे, अनंता महादेव गरदडे, सदानंद राजेंद्र उर्फ राजाभाऊ गरदडे, सर्व राहणार मौजे वाणेवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर, अभिजीत उत्तमराव पाटील, फ्रुट कमिशन एजंट, आशापुरा सोसायटी सेक्टर १६ सानपाडा नवी मुंबई, यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६८,४७१,३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कलम रोपे व विविध फळांचे अभ्यासक संशोधक डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांनी शेतीमध्ये निरीक्षणे व परागीकरण तसेच संशोधन करून विविध फळांचे वाण विकसित केलेले आहेत. त्याबाबत गुजरात राज्य सरकार यांच्या मार्फत सध्याचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना तसेच तत्कालीन भारत सरकार कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी डॉक्टर कसपटे यांना पुरस्कृत केलेले आहे.

संपूर्ण भारत देशात लागवड होत असलेल्या एकूण सिताफळ लागवडी पैकी सुमारे ८० टक्के सिताफळ लागवड ही डॉ. कसपटे यांच्या एन एम के १ गोल्डन या सिताफळ वाणाची होते. या वाणाची कृषी मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत संचलित पीक वाण नोंदणी निबंधक कार्यालयात सर्व वैधानिक औपचारिकता पूर्ण करून डॉ. कसपटे यांना नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले आहे. हे नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर डॉ नवनाथ कसपटे यांना या वाणाची उत्पादन, वाहतूक, विक्री व साठा याबाबतचे सर्व अधिकार प्राप्त झालेले आहेत. तसेच या वाणाची संपूर्ण सर्वार्थाने मालकी डॉ. कसपटे यांना या प्रमाणपत्राद्वारे प्राप्त झाली आहे. मात्र काही सिताफळ रोपवाटिका धारक विविध नावाने एन एम के १ गोल्डन या वाणाची लागवड व कलम रोपांची विक्री करून डॉ कसपटे यांची रॉयल्टी देण्याबाबत विविध युक्त्या प्रयुक्त्या करून टाळाटाळ करीत आहेत. याबाबतीत संबंधित अनाधिकृत रोपवाटिका यांच्याविरुद्ध नुकसान भरपाई बाबत बार्शी येथील न्यायालयात दिवाणी दावे सुरू आहेत.

त्या दिवणी दाव्यांमध्ये दावा केलेली नुकसानभरपाईची रक्कम चुकवण्यासाठी दिवाणी दावे दाखल केल्यानंतर जाणूनबुजून डॉ. कसपटे यांचे विरूध्द सिताफळ वाण नोंदणी बाबत संबंधित निबंधक कार्यालयामध्ये यातील आरोपी यांनी डॉ. कसपटे यांच्या सीताफळ वाण नोंदणी प्रमाणपत्र विरुद्ध पूर्वीपासून आम्ही अशा प्रकारची सिताफळ उत्पादन करीत असल्याबाबत बनावट पुरावे तयार करून संबंधित कार्यालयात सादर केले आहेत. त्याचे सदर कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर सदानंद राजेंद्र उर्फ राजाभाऊ गरडे यांचे वडील राजेंद्र उर्फ राजाभाऊ महादेव गरदडे मौजे वाणेवाडी , हे दिनांक २० एप्रिल २०१२ रोजी मयत झाले असतानासुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच नावाने बनावट पावत्या तयार करून त्या खऱ्या आहेत अशा भासवून निबंधक कार्यालयात पुराव्यादाखल सादर करून फसवणूक केली आहे.

तसेच मौजे वाणेवाडी, तालुका बार्शी येथील शेतजमीन गट नंबर १२७/२ मधील गाव नमुना सातबारा वरील पीक नोंद नोंदवहीमध्ये सन १९९५-९६ व १९९६-९७ या साली सीताफळ या फळबागेची लागवड असल्याबाबत महसूल विभागाच्या नमुना नंबर १२ या पीक नोंदवहीमध्ये आगाऊ शब्द वापरून खाडाखोड करून बनावट पुरावे कागदपत्रे तयार करून ते खरे आहेत असे भासवून ते पीक वाण निबंधक कार्यालय येथे सादर करून फसवणूक केली आहे. सदर सातबारा उताऱ्यामध्ये अनंता महादेव गरदडे यांचे ९४ आर क्षेत्रफळ असून उताऱ्यावरील सिताफळ या शब्दांमध्ये रेषा मारून खोडल्यासारखे करून दोन्ही शब्दातील हस्ताक्षरामध्ये फरक स्पष्ट दिसत असून ९४ आर क्षेत्रामध्ये एकाच वर्षी सीताफळ ९४ आर व बोर या फळाची ९४ आर असे दुप्पट क्षेत्रात फळपीक असल्याबाबत नोंद खाडाखोड केली आहे.

अशाप्रकारे कागदपत्रांचे बनावटीकरून करून खरे आहेत असे भासवून संगनमताने पीक वाण निबंधक कार्यालय नवी दिल्ली येथे वापर करून फसवणूक केल्याचे डॉ. कसपटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Previous Post

सोलापूरच्या अक्षय इंडीकरचा कॅनडात डंका

Next Post

केम येथे दोघांना अटक, ९६ हजारांचा गांजा जप्त

Next Post
केम येथे दोघांना अटक, ९६ हजारांचा गांजा जप्त

केम येथे दोघांना अटक, ९६ हजारांचा गांजा जप्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group