• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, July 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लेखापरीक्षकांनी वाचविले कोरोना रूग्णांचे 2 कोटी अडीच लाख रूपये

by Yes News Marathi
June 17, 2021
in मुख्य बातमी
0
लेखापरीक्षकांनी वाचविले कोरोना रूग्णांचे 2 कोटी अडीच लाख रूपये
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,दि.17: कोरोना उपचारावर शासनाने ठरवून दिलेल्या बिलांच्या दरांपेक्षा अधिकचे दर लावून रूग्णांची लूट करणाऱ्या दवाखान्यांना लेखापरीक्षकांनी चाप लावला आहे. सोलापूर शहरात वर्षभरात खासगी रूग्णालयांनी 7 हजार 860 कोरोना रूग्णांना लावलेले जादाचे दोन कोटी दोन लाख 49 हजार 933 रूपये लेखापरीक्षणांमुळे कमी झाले आहेत. यामध्ये शहरातील 47 दवाखान्यांचा समावेश असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

        कोरोना काळात खाजगी रूग्णालये रूग्णांकडून जादा बील वसूल करीत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहर आणि ग्रामीण भागात खाजगी रूग्णांलयासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक नियुक्त केले होते. सोलापूर शहरात 26 लेखापरीक्षक नेमण्यात आले होते. प्रत्येक लेखापरीक्षकांकडे दोन-तीन रूग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याची जबाबदारी मनपा आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली होती.

        शहरातील 47 रूग्णालयांनी 7860 रूग्णांचे 50 कोटी 72 लाख 14 हजार 376 रूपये बील आकारले होते. यातील शासन निर्देशातील दरानुसार लेखापरीक्षकांनी तपासणी करून दोन कोटी दोन लाख 49 हजार 933 रूपये जादा आकारले गेलेले पैसे कमी करण्यात आले आहेत.

        रूग्णांचे डिस्चार्ज होण्यापूर्वी रूग्णालयांनी केलेले बील लेखापरीक्षकाकडे जाते. लेखीपरीक्षक बिलाची तपासणी करून जादा बील आकारले असेल तर कमी करून देतात. शासनाच्या निर्देशानुसार बील असेल तर ते रूग्णांच्या नातेवाईकांना भरावे लागते.

        प्रत्येक लेखापरीक्षकांना दोन-तीन दवाखान्याची जबाबादारी देण्यात आली आहे. मनपाच्या कोविड कंट्रोल रूमला तक्रार आली किंवा फोन आला तर रूग्णालयात जावून बिलाची तपासणी केली जाते. जून 2020 पासून बिलांची तपासणी करण्यात आली असून रूग्णांना बील कमी करून दिलासा दिला आहे. यामुळे बिलाबाबत रूग्णांच्या फसवणुकीचे प्रकार थांबले असल्याचे लेखाधिकाऱ्यांचे समन्वय अधिकारी विशाल पवार यांनी सांगितले.

    सहा रूग्णालयांनी शासन दराप्रमाणे रक्कम आकारली

सोलापूर सिटी हॉस्पिटल- 20 रूग्णांचे 10लाख 12 हजार 460 रूपये, नोबल हॉस्पिटल- 46 रूग्णांचे 18लाख26हजार 900 रूपये, कृष्णा हॉस्पिटल- 17 रूग्णांचे पाच लाख 34 हजार रूपये, बालाजी हॉस्पिटल-24 रूग्णांचे 5 लाख 51 हजार 200 रूपये, श्री. बालाजी हॉस्पिटल, सैफुल-तीन रूग्णांचे 77 हजार 200 रूपये आणि युगंधर हॉस्पिटलमधील एका रूग्णांचे 34 हजार 90 रूपये या रूग्णालयांनी शासकीय दराप्रमाणे रूग्णांकडून रक्कम आकारली आहे.

शहरातील रूग्ण आणि रकमेची आकडेवारी

बील कमी केलेल रूग्ण-7860

एकूण बिलाची रक्कम-50 कोटी 72 लाख 14 हजार 376 रूपये

कमी केलेले बील- दोन कोटी दोन लाख 49 हजार 933 रूपये.

        रूग्णालयांनी आकारलेली रक्कम, कमी केलेली रक्कम आणि रूग्णसंख्या

अल-फैज हॉस्पिटल- 30 लाख 81 हजार 683 रूपये- एक लाख 33 हजार 680 रूपये (117 रूग्ण), डॉ. रिजवान अपेक्स हॉस्पिटल- 42 लाख 64 हजार- 700 रूपये (64 रूग्ण), अश्विनी सहकारी रूग्णालय- 13 कोटी 82 लाख 95 हजार 324 रूपये- एक लाख 28 हजार 354 रूपये (1492 रूग्ण), एस.एस. बलदवा हॉस्पिटल- 94 लाख 64 हजार 4 रूपये- 54 हजार 960 रूपये (211 रूग्ण), बळवंत इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो- 61 लाख 62 हजार 100 रूपये-दोन लाख 85 हजार 515 रूपये (140 रूग्ण), सेंट्रल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल- 58 लाख 71 हजार 100 रूपये-77 हजार 900 रूपये (151 रूग्ण), चंदन न्युरो सायन्स- एक कोटी 87 लाख 51 हजार 262 रूपये- सात लाख 50 हजार 344 (230 रूग्ण), सिटी हॉस्पिटल- 71 लाख 15 हजार 865 रूपये- एक लाख 7865 रूपये (207 रूग्ण), धनराज गिरजी हॉस्पिटल-एक कोटी 64 लाख 94 हजार 241 रूपये- 10 लाख 66 हजार 962 रूपये (404 रूग्ण), डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल-9लाख 77 हजार 575 रूपये- 1200 रूपये (46 रूग्ण), डॉ. रघोजी हॉस्पिटल- 23 लाख 20 हजार रूपये- 19 हजार900 (57 रूग्ण), गंगामाई हॉस्पिटल- एक कोटी नऊ लाख 57हजार 690 रूपये- एक लाख 92 हजार 700 रूपये (197 रूग्ण), हृदयम हॉस्पिटल- 35 लाख93 हजार 500 रूपये-एक लाख 28 हजार रूपये (60 रूग्ण), जय हॉस्पिटल-15लाख 8हजार 40 रूपये- 6 हजार 250 रूपये (42 रूग्ण), जोशी क्लिनिक-27 लाख48हजार300 रूपये-25 हजार800 रूपये (40 रूग्ण), जुनैडी हॉस्पिटल-एक लाख 7 हजार 950 रूपये-2800 रूपये (6 रूग्ण), लाईफ लाईन हॉस्पिटल-66 लाख 61 हजार931 रूपये- तीन लाख 22 हजार 705 रूपये (128 रूग्ण), लोकमंगल जीवक हॉस्पिटल-10 लाख 78 हजार727 रूपये- 16 हजार 27 रूपये (30 रूग्ण), श्री मार्कंडेय सहकारी रूग्णालय-पाच कोटी 44 लाख 49 हजार 292 रूपये-44लाख 61हजार 905 रूपये(593 रूग्ण), मोनार्क हॉस्पिटल-87 लाख 77 हजार 982 रूपये-22 हजार रूपये (304 रूग्ण), नान्नजकर हॉस्पिटल- चार लाख 62 हजार 500 रूपये- चार हजार रूपये (23 रूग्ण), नर्मदा हॉस्पिटल- दोन कोटी 24 लाख 77 हजार 972 रूपये- 25 लाख 60 हजार 19 रूपये (459 रूग्ण), नवनीत हॉस्पिटल-तीन कोटी 55 लाख 38 हजार956 रूपये-32हजार 861 रूपये (428 रूग्ण),न्यू लाईफ हॉस्पिटल-30 लाख 23 हजार 50 रूपये- 46 हजार 400 रूपये (75 रूग्ण), निर्मल हॉस्पिटल- 21 लाख 98 हजार 140 रूपये- एक लाख 16हजार 840 रूपये (42 रूग्ण), फिनिक्स हॉस्पिटल-25लाख 63 हजार70 रूपये-एक लाख 85 हजार 570 रूपये (71 रूग्ण), कादरी हॉस्पिटल- 43 लाख 79 हजार 400 रूपये- 24हजार 300 रूपये (90 रूग्ण), एस.एल. हॉस्पिटल- 23 लाख 26 हजार 250 रूपये-98 हजार 170 रूपये (43 रूग्ण), एस.पी. इन्स्टिट्यूट- एक कोटी 72 लाख 72 हजार 73 रूपये-19 लाख तीन हजार 87 रूपये (246 रूग्ण), श्रीराम हा4ट केअर-15लाख35हजार600 रूपये-28हजार 300 रूपये (23 रूग्ण), सिद्धार्थ हॉस्पिटल- 22 लाख 74 हजार 153 रूपये- 22 हजार 780 रूपये (78 रूग्ण), सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल-65 लाख 13 हजार 440 रूपये- तीन लाख 23 हजार 770 रूपये (169 रूग्ण), सोलापूर केअर हॉस्पिटल- 76 लाख 78 हजार 700 रूपये-24 हजार 800 रूपये (153 रूग्ण), सोलापूर पाईल्स हॉस्पिटल-10 लाख 67 हजार 450 रूपये- 8हजार 325 रूपये (26 रूग्ण), सोलापूर प्राईड हॉस्पिटल- एक कोटी 36 लाख 99 हजार 891 रूपये- 13 लाख 23 हजार 582 रूपये (250 रूग्ण), स्पॅन हॉस्पिटल-20 लाख 89 हजार 409 रूपये-78 हजार 200रूपये (79 रूग्ण), स्पर्श हॉस्पिटल- तीन कोटी 39 लाख64 हजार 911 रूपये-22लाख 38 हजार 723 रूपये (416 रूग्ण), सुहा नर्सिंग होम- सहा लाख 2200 रूपये-400 रूपये (12 रूग्ण), सन शाईन हॉस्पिटल- 26 लाख 23 हजार 300 रूपये-दोन लाख 6672 रूपये (74 रूग्ण), यशोधरा हॉस्पिटल- तीन कोटी 54 लाख 79 हजार 186 रूपये-32 लाख 4हजार 812 रूपये (420 रूग्ण), झीशान हॉस्पिटल- 27 लाख 28 हजार 310 रूपये-12 हजार 755 रूपये (53 रूग्ण).

Previous Post

जुलै महिन्याचे नियतन प्राप्त

Next Post

पीएफएमएस प्रणालीचे सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांना प्रशिक्षण

Next Post
पीएफएमएस प्रणालीचे सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांना प्रशिक्षण

पीएफएमएस प्रणालीचे सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांना प्रशिक्षण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group