सोलापूर शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट २ टक्कयांच्या आता आल्यामुळे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवार दि. १४ जूनपासून नवे नियम जाहीर केले आहेत. शाळा, महाविद्यालये वगळता सर्व निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे सोलापूर शहरात सर्व व्यवहार पूर्व पदावर येतील. सर्व प्रकारची दुकाने, मौल्स, थिएटर, नाट्यगृहे, हॉटेल, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठका, सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक यावर आता कोणतेही निर्बंध नसणार आहेत. जिम, ब्युटी पार्लर, विविध प्रकारचे खेळ यावरील देखील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. विवाह समारंभासाठी १०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे तर अंत्यसंस्कारासाठी कोणतेही नियम नाहीत. प्रार्थना स्थळे आणि शाळा, महाविद्यालये वगळता सर्व आस्थपना पूर्वीप्रमाणे कोणत्याही निर्बंधांशिवाय सुरु राहतील.