सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा शनिवार दिनांक १२ जून चा अहवाल प्राप्त झाला आहे शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात नवीन ४८७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत ४९३ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत . तसेच १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात सर्वाधिक ११३ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. इतर सर्व तालुक्यात शंभरपेक्षा कमी नवीन रुग्ण आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये म्यूकरमायकोसिसचा नवीन एकही रुग्ण आढळलेला नाही.