सोलापूर : अलकुंटे चौक स्लेटर हाऊस येथील घरासमोर दगड , फरशा ठेवत असताना हटकल्यानंतर सुरेखा मोहन राजपूत उर्फ आंबेवाले आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या दहा जणांनी शिवीगाळ करून दगडफेक केल्याची फिर्याद सविता विजय म्हेत्रे यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात केली आहे. हा प्रकार अलकुंटे चौकातील स्लेटर हाऊस नजीक सविता म्हेत्रे यांच्या घरासमोर घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुरेखा आंबेवाले यांच्यासमवेत मोहन आंबेवाले , गीता गोरंदेवाले आनंद पंतूवाले, कमल कय्यावाले , ज्योती बोधीवाले असे इतर दहा ते पंधरा लोक होते असेही तक्रारीत म्हटले आहे. या दगडफेकीमुळे गल्लीत राहणारे राजेश व्यंकटेश गंदम यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस सबइन्स्पेक्टर शेख अधिक तपास करीत आहेत.