सोलापूर : लिमयेवाडी येथील समर्थ हॉस्पिटलच्या पाठीमागे कोळेकर पिठाच्या गिरणी जवळच्या रस्त्यावरून जात असताना बलभीम यल्लाप्पा जाधव याला चाकूने धमकावून त्याच्या खिशातील पंधराशे रुपये काढून घेतल्याची फिर्याद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हा प्रकार लिमयेवाडी येथे औषधी दुकानात पायी जात असताना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी कबूतर आकाश आणि लिंबू रोहित (दोघांचीही पूर्ण नावे माहीत नाहीत) या सेटलमेंट फ्री कॉलनीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पवार अधिक तपास करीत आहेत.