येस न्युज मराठी नेटवर्क : आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होतेय. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे लोकनिर्माण मंत्री तसंच मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. सकाळी ११.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण मार्ग स्थित निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झालीय.. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण, लसीकरण अशा अनेक मुद्यांवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात ही चर्चा होणार आहे. या अगोदर, मे महिन्याच्या अखेरीस या दोन्ही नेत्यांत शेवटची चर्चा झाली होती.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची बैठक निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू आहे.
गेल्या तासाभरापासून मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आहेत
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत
अजित पवार आणि अशोक चव्हाण हेदेखील या बैठकीत उपस्थित असणार आहेत
महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील या बैठकीला उपस्थित आहेत