सोलापूर : सुनील मोरे हा त्याचा मित्र सुरेश परदेशी यांच्या बरोबर विजापूर नाका येथील धानम्मा मंदिराजवळ थांबला असताना त्याला मागील भांडणाचा राग मनात धरून परदेशी याने शिवीगाळ करून मारहाण केली आहे. याबाबत मारूती नारायण जाधव यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मारुती जाधव यांच्याकडे सुनील मोरे हा कामगार म्हणून काम करीत होता. याप्रकरणी पोलीस नाईक शिवशरण अधिक तपास करीत आहेत.