येस न्युज मराठी नेटवर्क : देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे. दररोज चार लाखांच्या आसपास नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. अनेक राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. आरोग्ययंत्रणा कोलमडली असून, लॉकाडउन देखील लागू करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ८ वाजेपर्यंतची देशभरातील राज्यांमधील करोनापरिस्थिती दर्शवणारी आकडेवारी समोर आली आहे. केंद्राने करोनबाधितांच्या संख्येनुसार राज्यांची तीन प्रकारात वर्गवारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या म्हणजे करोनाबाधितांची एकूण संख्या ५,५०,००० पेक्षा अधिक असलेल्या राज्यांमध्ये आहे.
देशात आज (९ मे) सकाळी ८ वाजेपर्यंत १,८३,१७,४०४ जण करोनातून बरे झाले आहेत. तर, ३७,३६,६४८ अॅक्टिव्ह केसेस असून, २,४२,३६२ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामधील ७० टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यू हे कोमॉर्बिडीटमुळे झालेले आहेत.
०१- ६०००० पर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या असलेली राज्ये –
चंदीगढ – एकूण करोनाबाधित ४९ हजार ३१२ व मृत्यू – ५५८ , त्रिपुरा – एकूण करोनाबाधित ३७ हजार ५५९ व मृत्यू ४०६, मणिपूर – एकूण करोनाबाधित ३४ हजार ७७५ व मृत्यू – ४६१, अरूणाचल प्रदेश – एकूण करोनाबाधित २० हजार ४६ व मृत्यू ६०, मेघालय – एकूण करोनाबाधित १९ हजार ३०२ व मृत्यू – २१०, नागालँड – एकूण करोनाबाधित १५ हजार ९१३ व मृत्यू १३७, लडाख एकूण करोनाबाधित – १५ हजार १७९ व मृत्यू १५३, सिक्कीम – एकूण करोनाबाधित ९ हजार ६५१ व मृत्यू – १६५, दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दीव – एकूण करोनाबाधित ८ हजार ७३७ व मृत्यू -४, मिझोरम – एकूण करोनाबाधित ७ हजार ५५१ व मृत्यू १७, अंदमान व निकोबार – एकूण करोनाबाधित ६ हजार ३४१ व मृत्यू ७४, लक्षद्वीप – एकूण करोनाबाधित ३ हजार ७५६ व मृत्यू ९