येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आणि आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आर अश्विनने आयपीएल 2021 च्या उरलेल्या सामन्यांतून माघार घेतली आहे. सध्या माझं कुटुंब हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. कोरोनाने होत्याचं नव्हतं केलंय. माझं कुटुंब कोरोनाचा सामना करत आहे. अशावेळी मी त्यांच्यासोबत असणं महत्त्वाचं वाटतं. त्याचमुळे मी उरलेल्या सामन्यांतून माघार घेत आहे, अशी घोषणा आर अश्विनने ट्विट करुन केली आहे.
आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय जाहीर करताना अश्विनने ट्विटमध्ये म्हटलंय, “आयपीएलच्या 14 व्या पर्वात मी उद्यापासून ब्रेक घेतोय. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासमवेत असावं असं मला वाटतं. जर पुढील गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी पुन्हा दिल्लीसाठी खेळायला येईन.