सोलापुरातील समाचार चौकात राहणारे दैनिक विश्व समाचारचे मालक आणि पत्रमहर्षी बाबुराव जक्कल यांचे चिरंजीव जयंतराव जक्कल (वय-९२) यांचे सोमवार दि.२९ मार्च रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. जयंतराव जक्कल यांनी कराड बँकेचे संचालक, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे संचालक, लायन्स क्लब, सरस्वती मंदिर प्रशाला, सिद्धसाधना संघ आदी विविध संस्थांवर कार्य केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत सोमवारी सायंकाळी अंत्यविधी करण्यात येणार आहे.