सोलापूर : भारत सरकारच्या शहरी आवास व कार्यासन मंत्रालय नवी दिल्ली यांचे कडुन देशातील सुमारे ११४ शहरांमध्ये Ease of Living Index (राहणेसाठी उत्तम शहर ) अंतर्गत सादरीकरण व सर्वेक्षण सन 2019-20 या वर्षात करणेत आलेले होते. त्यामध्ये सोलापूर स्मार्टसिटी चा देशातील 114 शहरामधुन सोलापूर स्मार्ट सिटीला 17 वे मानांकन प्राप्त झालेले आहे. तसेच महाराष्ट्रात 4 थे मानांकन प्राप्त झालेले आहे.
शासनाकडुन प्राप्त झालेल्या निदेशनानुसार शहराचे सादरीकरण व नागरिकाकडुन प्राप्त सर्वेक्षणामध्ये शहरामध्ये व्यवसाय, शैक्षणिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, परवडणारी राहणेसाठी घरे, शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, शहरातील सुरक्षितता, दळणवळण साधने, अग्निशामक दल व अॅम्ब्युलन्स यांची उपलब्धता, सार्व.ठिकाणी महिलांची सुरक्षितता, मैदाने ब सिनेमाहॉल याबाबतची उपलब्धता , शहरातील व्यवसायाच्या उपलब्ध संधी, शहरातील विविध आर्थिक सेवा जसे बॅक, इन्शुरन्स, एटीएम, क्रेडीट इ.बाबत, माहितीचे सादर करणेत आलेली होती. सदर सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र शासनास सादर करणेत आला. तसेच नागरिकांकडुन सुध्दा याबाबत प्रतिसाद घेणेत आला.
सोलापूर शहरात 28 शाळामध्ये स्मार्ट क्लासरुम बनविण्यात येत आहे. प्रधान मंत्री आवास योजनेची प्रभावी अमंलबजावणी होत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी 225 घंटागाड्या व 4 ट्रान्स्फरस्टेशनद्वारे सुयोग्य कार्यबाही केली जाते. घरोघरी ओला व सुका कच-याचे विलगीकरण करणेसाठी दीडलक्ष डस्टबिन वाटप करणेत आले आहे. समांतर जलवाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच स्मार्टसिटी क्षेत्रात सर्व पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स बदलुन वॉटर मीटर बसविणेत येणार आहे. तसेच नागरिकांना 24 तास पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट आहे. संपुर्ण शहराचे पाणी वितरण व्यवस्था स्काडा प्रणाली द्वारे करणेचे काम हाती घेणेत येत आहे. शहर सुरक्षिततेसाठी शहराच्या चौकाचोकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणित येत आहेत. शहरातील रस्तेबांधणी नव्याने होत आहे. शहरामध्ये दोन फ्लायओव्हर राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण मार्फत प्रस्तावित आहेत. महिलाच्या सुरक्षितेतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेत येत आहे.
तसेच शहरातील नागरिकांसाठी होम मैदान येथे वॉकिंग ट्रॅक तयार कऱणेत येवुन सदरचा परिसर सुशोभित करणेत आलेला आहे. तसेच शहरातील पार्क स्टेडिअमचे सुधारणा करुन भविष्यात प्रथमश्रेणी क्रिकेट चे सामने आयोजित करणेकामी स्टेडिअमचा कायापालट केलेला आहे. सदर स्टेडिअमध्ये 17 प्रॅक्टिस पिचेस बनविणेत आलेले आहे. शहरातील स्वचछतेचा विचार करात स्मार्ट सिटी अंतर्गत एकुण 50 ठिकाणी ई-टॉयलेट ची स्थापना करणेत आलेली आहे. शहरातील अस्तित्वातील दिवे बदलुन त्याठिकाणी नवीन एलईडी स्ट्रीट लाईट बसविणेत आलेली आहे. त्यामुळे विजेची बचत होत आहे. अशा प्रकारच्या विविध प्रकल्पामुळे सदरहु प्रस्ताव व सर्वेक्षण करणेकामी महापौर,आयुक्त सो.म.पा. व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कार्यालय तसेच शहरातील नगरसवेक व नागरिक यांचे सहकार्यामळे सोलापूर शहरास 17 वे मानांकन प्राप्त झालेले आहे.