नागपूर : राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांनी सरकारी भ्रष्टाचाराबद्दल अजब वक्तव्य केलं आहे. “भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेचा भाग बनला आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही, मात्र भ्रष्टाचार आज यंत्रणेचा भाग बनला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला सरकारी यंत्रणेमधून खणून काढणे अत्यंत कठीण झाले आहे,” असं हेमंत नगराळे म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.
“आम्ही फक्त लाचलुचपत प्रतिबंधात्मक कारवाया वाढवून अधिकाऱ्यांना भ्रष्ट आचरणापासून दूर ठेऊ शकतो,” असं महासंचालक नगराळे म्हणाले. पोलीस आणि महसूल खात्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य आहे.