सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मानेगावात रघुनाथ पारडे या मुलीच्या वडिलांनी मुलीच्या लग्नात 750 केशरी आंब्याच्या रोपट्याचे वाटप करुन वृक्षारोपणाचा संदेश दिला आहे.
माढा तालुक्यातील मानेगावातील शितल रघुनाथ पारडेचा कापसेवाडीच्या भरत भिवाजी कापसे या शेतकऱ्याच्या नवदाम्पत्याचा विवाह सोहळा माढा तालुक्यातील मानेगावात पार पडला. वधु पती रघुनाथ पारडे यांनी अन्नपुर्णा फांउडशेनचे मारुती शिंदे, सुशील पारडे यांच्या मार्गदर्शनातून हा अभिनव उपक्रम राबविला गेला. शितल आणि भरत या नवदामपत्याने देखील सहमती दर्शवली.
सत्काराच्या खर्चाला बगल देऊन लग्नाला आलेल्या वऱ्हाडी, पै पाहुण्यांसह मान्यवर या सर्वांनाच वधुचे वडील रघुनाथ पारडे आणि आई सविता या दोघांनी लग्न मंडपाच्या प्रवेशद्वारासमोर थांबून आंब्याच्या रोपट्याचे वाटप करुन आदर्श घडवला. हे इतरांसाठी तो अनुकरणीय असाच आहे. अशा उपक्रमांचा इतरांनी देखील अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे नवदाम्पत्याने सांगितले.