सोलापूर : सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. मात्र ही सत्ता आल्यापासून त्यांना कारभार करणंच मुश्किल झाल आहे. गटातटाचे राजकारण आणि हेवेदावे त्यामुळे भाजपची सत्ता महापालिकेत येऊन काहीच फायदा झाला नाही. याचा फायदा विरोधक घेत असून यामुळे कारभाराचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे दोन आमदार आणि एक खासदार शिवाय महापालिकेत सत्ता असताना देखील भाजपची अवस्था केविलवाणी आहे. शहरातील अतिक्रमणे…महापालिकेचे उत्पन्न वाढवणे… BOT कॉम्प्लेक्स… स्मार्ट सिटी या कामामध्ये सुसूत्रता आणणे याकडे एकाही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांपेक्षाही विरोधकांचे नगरसेवक आक्रमक होऊन जादा निधी खेचून येत आहेत. यंदाचे भाजपच्या सत्तेतील हे चौथे वर्ष असून पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका आहेत त्यामुळे निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन भाजप जनतेच्या समोर जाणार हा एक मोठा प्रश्न आहे दोनच दिवसापूर्वी झालेली अर्थसंकल्पीय सभा तहकूब करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली आहे त्यामुळे सत्ता देऊनही भाजपने काहीच केले नाही असे दिसत आहे