सायकल लवर्स सोलापूर चा उपक्रम 54 सायकलिस्टचा सहभागी
76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोलापुरातील सायकल लवर्स सोलापूर या क्लब कडून रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी 76 किलोमीटर सायकल राईड चे आयोजन करण्यात आले होते. या राईडमध्ये सोलापुरातील विविध क्षेत्रातील नामवंत सायकल प्रेमींनी सहभाग नोंदवून सोलापूर ते माचनूर परत सोलापूर असे 76 किलोमीटर अंतर पूर्ण केले. त्यात सर्वात कमी म्हणजे 8 वर्षाच्या श्रीनिवास ननवरे पासून 62 वर्षाच्या प्रकाश गिरी यांचा सहभाग होता.
सोलापुरातील भैय्या चौक येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून सकाळी सहा वाजता राइडला सुरुवात झाली. एसआर दादाराव इंगळे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. जमलेल्या नागरिकांनी सर्वांना या ऐतिहासिक राईड साठी शुभेच्छा दिल्या. पुढे कामती मार्गे माचनुर पर्यंत सायकलिंग करण्यात आले. माचनूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन परत भैया चौक पर्यंत असे 76 किलोमीटर सायकलिंग सर्वांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. यावेळी सर्व सायकल स्वरांनी तिरंगी रंगाच्या जर्सी परिधान केल्या होत्या तसेच सायकल ला तिरंगी झेंडे फडकत होते. आणि देशभक्तीपर घोषणा दिल्या जात होत्या. त्याद्वारे देशप्रेम जागृत करण्याचे कार्य सायकल लवर्स च्या सदस्यांनी राईडच्या माध्यमातून केले.
या राईड चे आयोजन करण्यासाठी राईट समन्वयक दादाराव इंगळे महिला समन्वय डॉक्टर रूपाली जोशी यांच्यासह सायकल लवर्सचे पदाधिकारी महेश बिराजदार अविनाश देवाडकर , प्रवीण जवळकर, इंजि. अमेय केत, डॉक्टर प्रवीण ननवरे , देशमाने, अविनाश कुरापती व डॉ. राजश्री वाघचौरे यांनी परिश्रम घेतले.