सोलापूर : दक्षिण विधानसभा मतदारसंघात असलेल्या गावातील नवे रस्ते तसेच जुने रस्ते दुरुस्तीसाठी सुमारे साडेसात कोटी रूपये अर्थसंकल्पामधून मंजूर झाल्याची माहिती आ. सुभाष देशमुख यांनी दिली.
मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात आ. सुभाष देशमुख यांनी दक्षिण आणि उत्तर तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार हा निधी मंजूर झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी-शिवणी-तिर्हे रोडसाठी तीन कोटी तर दक्षिण तालुक्यातील गुंजेगाव-मनगोळी-वांगी व आहेरवाडी-मद्रे- कुमठे रोड, होटगी-औज-इंगळगी- जेऊर रोडसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महिन्याभरात या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील. या कामांसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता.