सोलापूर: नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन, नवी दिल्ली कडून पुर्नःमानांकन प्राप्त झालेला विजापूर रोडवरील ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये जॉन डीअर इंडिया लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न झाला.

या कॅम्पस ड्राईव्हमध्ये जॉन डीअर इंडिया लिमिटेड, पुणे च्या कुमारी धनश्री मराठे एच आर मॅनेजर, नीलकंठ कळके मॅनेजर ऑपरेशन व कुमारी सांधनी माहेश्वरी सीनियर इंजिनिअर या अधिकाऱ्यांनी ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील 61 विद्यार्थ्यांची निवड केली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस. ए. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष एस. एस. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. के. मोहिते व महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एम. एम. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागीय प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक ए. आर. मळेकर, के. डी. साळुंखे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग, प्राध्यापिका कु. एल. एस. केंदुले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग व विभागीय प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक पी. एस. दारा सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग यांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. एस. लिगाडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. आर. बागबान, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख आर. एस. मोटगी यांचेही सदर कार्यक्रमास सहकार्य लाभले.