सोलापूर । किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड शिवशाही येथे ५० व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता सप्ताहाचे (४ ते ११ मार्च) उदघाटन प्रमोद सुरसे, उपसंचालक औद्योगिक सुरक्षितता व आरोग्य, सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. आजच्या दिवशी सर्व कामगार व अधिकाऱ्यांना सुरक्षिततेची शपथ कंपनीचे सेफ्टी ऑफिसर अमित राठोड यांनी दिली.
यावेळी सोलापूर प्लांटचे प्रमुख एस एल कुलकर्णी,व्यवस्थापक विलास खरात आणि उदघाटक प्रमोद सुरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काम करताना अपघात होऊ न देता शून्य अपघाताचे ध्येय साध्य करावयाचे आहे. ५० व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता सप्ताहा निमित्त विविध जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात पथनाट्य,फायर फायटिंग,घोषवाक्य स्पर्धा आणि कॅन्टीन मध्ये सुरक्षितता संबंधित शॉर्ट फिल्म्स दाखविण्यात येणार आहेत तसेच सप्ताहाच्या शेवटी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास एस सी गुमास्ते, पी एल माडुलकर, एस एम जोशी, पी अर्स, अनंत जाधव, हृषीकेश कुलकर्णी, आप्पासो पाटील, दैदिप्य वडापूरकर व कामगार प्रतिनिधी पुंडलिक जाधव, अशोक कार्दाळकर, संजय गरड, सरवदे, शिंदे तसेच सर्व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.