सोलापूर शहराच्या सांस्कृतिक कॅलेंडर मधील एक महत्वाची इवेंट म्हणून सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या शारदीय व्याख्यानमलेला एक आगळे-वेगळे स्थान आहे बँकेचे संस्थापक सहकार महर्षि कै. वि. गु. शिवदारे यांच्या प्रेरणेने ही व्याख्यानमाला सुरू झाली. तद्नंतर, बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांनी देखील ही उन्नत परंपरा कायम चालू ठेवली. गेल्या ४२ वर्षापासून हा वाम्यज्ञ अविरत चालू आहे.
यंदाच्या वर्षी कार्यक्रमांचे आयोजन घट स्थापनेनंतर शुक्रवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ पासून हुतात्मा स्मृति मंदिरच्या सभागृहात केले असून कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ६.३० वाजताची आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष म्हणून बँकेचे मार्गदर्शक तथा स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांची उपस्थिती लाभली आहे. तर कार्यक्रमासाठी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभिरे आणि व्हाईस चेअरपर्सन सौ. सुचेता थोबडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी ऋषिकेश रानडे आणि मधुरा दातार यांचे सुश्राव्य गायन, “अभी ना जाओ छोडकर” या नावाने सुमधुर आणि लोकप्रिय अशा हिंदी आणि मराठी गाण्यांची अविस्मरणीय मैफल त्या दिवशी सजणार आहे. सर्व रसिक श्रोत्यांनी जरूर त्याचा आनंद घ्यावा.
शनिवार ५ ऑक्टोबर २०२४: वक्ते साहिल जोशी: विषय महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा : प्रसिद्ध पत्रकार, इंडिया टुडे आणि आज-तक वाहिनी समूहाचे संपादक साहिल जोशी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय घडामोडीवर अभ्यासपूर्ण भाष्य करणार आहेत.
रविवार दि. ६ ऑक्टोबर २०२४. वक्ते जयंत उमराणीकर विषय अंतर्गत सुरक्षेची आव्हानेः महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक असलेले जयंत उमराणीकर यांची एकंदर कारकीर्द अत्यंत थरारक आहे. भारताची गुप्तहेर संस्था RAW मध्ये देखील त्यांनी दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारी आणि दहशतवाद यांच्या विरुद्ध काम केले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था, संयुक्त राष्ट्र संघाच्या ड्रग्स आणि गुन्हे कार्यालयात त्यांनी काम केले आहे. त्यांचे व्याख्यान निश्चितच समाजासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४. वक्ते इंद्रनील बंकापुरे: विषय मंदिराच्या देशा : मंदिर स्थापत्यशास्त्र तज्ञ आणि प्रख्यात इंडॉलॉजिस्ट इन्द्रनील बंकापुरे आपल्या कार्यक्रमतून प्राचीन भारतीय इतिहास, मंदिरे, मूर्तीकला यांची ओळख करून देतात. या निमित्ताने भारतीय मंदीर वास्तूकलेची वैशिष्ट्ये आणि त्यांचे महत्व दुक-श्राव्य मध्यमातून उलगडून दाखवतात. अतिशय बोधप्रद असा हा कार्यक्रम आहे.
मंगळवार दि. ८ ऑक्टोबर २०२४: वक्ते चंद्रशेखर नेने विषयः भारताचे अस्वस्थ शेजारी : आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आणि जाणकार म्हणून श्री नेने यांची ओळख आहे. जवळपास सर्व मराठी वृतवाहिन्यावर नियमितपणे आंतरराष्ट्रीय घटनांचे विश्लेषक आणि भाष्यकार म्हणून येत असतात. भारताच्या शेजारच्या देशात असलेली राजकीय आणि सामाजिक अस्वस्थता आणि आपल्यावर त्यांचे होणारे बरे-वाईट परिणाम यावर आपले अभ्यासपूर्ण विचार ते मांडणार आहेत.
बुधवार दि. ९ ऑक्टोबर २०२४: वक्ते नीलेश ओक विषय: हिंदू संस्कृतीचा समृद्ध इतिहास : नीलेश ओक हे अमेरिकेतील इन्स्टिटयूट ऑफ ऍडवान्सड सायन्सेस या डार्टमाऊथ, मॅसाच्युसेट्स येथील संस्थेत संशोधक आणि अधिवक्ता प्राध्यापक या नात्याने निगडित आहेत. संशोधक या नात्याने ते श्रोत्यांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत ज्ञान, तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या पुरातनतेची माहिती देतात. त्यांचे शोध निबंध आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी पावलेले आहेत. त्यांचे व्याख्यान आपल्या सांस्कृतिक जाणीवा निश्चितपणे समृद्ध करतील.
गुरुवार दि. १० ऑक्टोबर २०२४: वक्ते डॉ. श्रीनंद बापट विषयः प्राचीन काळातील सोलापूर परिसर : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन, पुणे या संस्थेचे नोंदणीकार, क्युरेटर म्हणून काम पाहतात. प्राचीन उत्खनन, शिलालेख, ताम्रपट यांचा शोध आणि वाचन करून मानवी संस्कृतीचा मागोवा घेण्याचे काम संशोधक म्हणून करतात. सोलापूर शहर आणि परिसर किती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, त्याबद्दलचे आपले संशोधन सोलापूरच्या मर्मज्ञ श्रोत्यांना आपल्या व्याख्यानातून सांगणार आहेत.
सर्व कार्यक्रमांची वेळ सायंकाळी ६.३० वाजताची असून आपल्या माध्यमातून श्रोत्यांना विनंती आहे कि त्यांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद व्हावा.
गेल्या कांही वर्षापासून आमच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहून आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी बऱ्याच दिवसांनी मंडळाने ७ दिवस कार्यक्रम ठेवले आहेत. आपणाला विनंती की, आमच्या कार्यक्रमांना आपल्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी आणि सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत.
चेअरमन नरेंद्र गंभीरे, व्हाईस चेअरमन सुचित्रा थोबडे, सर व्यवस्थापक राम शर्मा शिवशंकर हाळगुणकी, महांतेश बिराजदार, प्रमोद नारायणकर चंद्रकांत मेहत्रे आधी उपस्थित होते.