येस न्युज मराठी नेटवर्क : मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील विनायक माधवराव यादव हे एका वास्तुशांतीसाठी मंगळवेढा येथे आले असताना त्यांच्याजवळील दागिन्यांचा पाऊच आणि काही रोख रक्कम चोरीस गेली होती या चोरीची उकल झाली असून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चोरट्यास 35 लाख 26 हजार 160 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे . सदर आरोपी हा गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबई येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याचप्रमाणे मंगळवेढा पोलीस ठाण्यात देखील वाळू चोरीचे तसेच दारू बंदी कायद्याखालील गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता संशयित इसम हा या घरांमध्ये वावरत असल्याचे दिसून आले होते .या संशयिताच्या उजव्या हातातील दोऱ्यांचा गोफ, डाव्या हातातील घड्याळ, केसाचा मशरूम कट आणि शरीरयष्टी आदी गोष्टी लक्षात घेत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. संशयिताने पोलिसांच्या चौकशीनंतर शेतातील बांधावर पुरून ठेवलेले दागिने आणि पैसे काढून दिले .या आरोपीस आता पुढील कारवाई करता मंगळवेढा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.