सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दररोज २१ हुन अधिक सामान्य व सिझर प्रसूती होतात. गत वर्षात ३४०० सामान्य प्रसुती तर ४४५३ सिझर प्रसूती झालेले आहेत. सीझर प्रसुतीचे प्रमाण वाढलेले आहे. या रुग्णालयामुळे सामान्य गरिबांचे लाखो रुपये वाचलेले आहेत.
येथील शासकीय रुग्णालयात शहर व जिल्ह्यातील गरोदर महिला ह्या प्रसूतीसाठी येतात. पहिल्यंदा नातेवाईक खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी महिलेला दाखल करतात. तेथे, सिझर प्रसूतीचा उपाय व काही हजारात येणारा खर्च सांगितले. की, नातेवाईक पुन्हा शासकीय रुग्णालय गाठतात. रुग्णाच्या नातेवाइकाला पहिल्यंदा सामान्य प्रसूतीसाठी प्रयत्न केली जाईल. नंतर, शेवटचा पर्याय म्हणून सिझर प्रसूतीचा पर्याय सांगतात. शहर जिल्ह्यासह कर्नाटाकातील विजयपुर, कलबुर्गी व बिदरसह अन्य जिल्ह्यातील महिला येथे प्रसूती येथे दाखल होतात यामुळे रुग्णासह रुग्णाच्या नातेवाइकांचे हजारो रुपये वाचतात.
प्रसूती विभागात तज्ज्ञ वैज्ञकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. यामुळे, प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिला रुग्णाची काळजी घेतली जाते. शिवाय, सामान्य प्रसूतीला येथील वैद्यकीय अधिकारी महत्त्व देतात. अडचणी आल्यास सिझरचा पर्याय निवडतात.
डॉ. ऋत्विक जयकर, प्रभारी अधिष्ठाता