सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन ची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जयकुमारजी पाटील उद्योग भवन, चिंचोळी MIDC येथे संपन्न झाली. सर्वप्रथम नवीन मल्टी युटीलिटी सेंटर या इमारतीचे भूमिपूजन अध्यक्ष राम रेड्डी यांच्या हस्ते, संस्थेच्या सभासदांच्या उपस्थितीत करण्यात आले.

त्यानंतर सभेच्या सुरुवातीला गो इजी बिजनेस चे संदीप येळवे आणि त्यांच्या टीम ने यांनी उपस्थित सभासदांना नियोजित 2024 चे औद्योगिक धोरण या संदर्भात मार्गदर्शन केलं. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र चे मंगेश पावसकर यांनी उपस्थित उद्योजकांना आपल्या बँकेच्या वेगवेगळ्या योजनांविषयी माहिती दिली.

त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यकारी सदस्यांनी मागच्या वर्षभरात असोसिएशन शी जोडल्या गेलेल्या नवीन सभासदांचे रोप देऊन स्वागत केलं.

त्यानंतर संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा अर्थात संस्थेच्या वार्षिक अहवालाचे अनावरण अध्यक्ष राम रेड्डी, उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, खजिनदार कमलेश शहासह सचिवा रामेश्वरी गायकवाड,सहसचिव सप्रेम कोठारी, यांच्या हस्ते करण्यात आले.
असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व असोसिएशन इतिहास तसेच आज पर्यतच्या प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती दिली.
असोसिएशन चे सहसचिव सप्रेम कोठारी यांनी गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेतला तर खजिनदार कमलेश शाह यांनी वार्षिक अकाउंट्स चे वाचन केलं.
त्यानंतर उपस्थित असलेले शरदकृष्ण ठाकरे, शिवशंकर आंधळकर,रमेश भट्टड, जयपाल महिंद्रकर, आनंद चव्हाण आदींनी सभासदांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात राम रेड्डी साहेबांनी असोसिएशन मार्फत पुढील काळात हाती घेण्यात येत असलेल्या योजनांची माहिती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना असलेल्या संधी बाबत माहिती दिली व तसेच सभासदांना असोसिएशन तर्फे घेण्यात येणार्या सेमिनार , ट्रेनिंग, मिटींग चा लाभ घेण्याचे आवाहन केले. सर्व सभासदांकडुन असोसिएशनला मिळत असेल्या सहकार्याबद्दल हि त्यांनी सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला कार्यकारी सदस्य अभिषेक तापडिया, स्वप्नील ईगा, शिवशंकर आंधळकर, तारासिंग राठोड, सी ए धनराज नोगजा, एमआयडीसी चे मगर सर, कोळेकर सर , फायर ब्रिगेड चे दिनेश अंभोरे,बॅंक ऑफ महाराष्ट्र चे झोनल मॅनेजर संजय वाघ आणि मोठ्या प्रमाणात उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मॅनेजर विनायक दुदगी यांनी केलं तर आभार सह-सचिवा रामेश्वरी गायकवाड यांनी मानले.