स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे संघ सहभागी
महामहिम राज्यपाल कार्यालय आयोजित 26 वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ, क्रीडा महोत्सव 2024 स्पर्धा दि.17 ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली यांनी त्यांच्या परिक्षेत्रातत असलेले चंद्रपुर व बल्लारपूर येथे आयोजित केलेल्या आहेत. सदर स्पर्धेत मुले व मुलींच्या ॲथलेटिक्स,बास्केटबॉल,व्हॉलीबॉल,कबड्डी, खो-खो,बॅडमिंटन, टेबल-टेनिस, चेस (बुध्दिबळ) खेळाचा समावेश आहे.
क्रीडा महोत्सव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वरिल क्रीडा प्रकारांचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन विद्यापीठ परिसरात दि.08 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत करण्यात आले होते. यामध्ये बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, टेबल-टेनिस, चेस (बुध्दिबळ) मुले व मुली खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक यांच्या राहण्याची व चहा,नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तर ॲथलेटिक्स मुले व मुली यांचे सदर स्पर्धापुर्व शिबीराचे आयोजन डी.बी.एफ.दयानंद कॉलेज ऑफ आर्टस ॲन्ड सायन्स व बॅडमिंटन मुले व मुली यांचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन डी.ए.व्ही.वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा.प्रा.डॉ.लक्ष्मीकांत ब.दामा यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रीडा महोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोलापूर ते गडचिरोली व परतीच्या प्रवासाकरिता विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रा.डॉ.बी.पी.रोंगे यांनी दोन बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीराचा सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन सभागृहामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यापीठाच्या विविध खेळाच्या संघ, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना मा.कुलगुरू मा.प्रा.प्रकाश महानवर, कुलसचिवा योगिनी घारे, मा.व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.सचिन गायकवाड व विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रा.डॉ.बी.पी.रोंगे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या स्पर्धेत सहभागी होवून सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूंनी चांगली कामगीरी करून यश मिळवावे व जास्तीत जास्त पदके मिळवून विद्यापीठाचे नाव उज्वल करावे असे आव्हान मा.कुलगुरू महोदयांनी खेळाडूंना केले. यावेळी उपस्थित असलेले संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांचा मा.कुलगुरू महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागाचे संचालक डॉ.अतुल लकडे यांनी केले, सुत्रसंचालक प्रा.श्री.मल्लिकार्जुन पाटील यांनी केले तर प्रा.बाळासाहेब वाघचवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.