बालाजी अमाईन्स लि सोलापूर यांच्या सीएसआर अंर्तगत, प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर, रोटरी क्लब ऑफ सोलापूर, एस टी महामंडळ आणि शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रकिया शिबीरात २५७ जणांची तपासणी करण्यात आली यापैकी १३ जणांवर मोतीबिंदू शस्त्रकिया करण्यात येणार आहे या शिबीरात १८५ चष्मे वाटप करण्यात आले.


या शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच प्रकल्प प्रमुख मितेश पंचमिया यांनी स्वागत केले. या नंतर बालाजी अमाईन्सच्यावतीने सीएसआर प्रमुख अनिल विपत यांनी बालाजी अमाईन्सच्या विविध सीएसआर उपक्रमांची माहिती दिली .तसेच रोटरीचे नियुक्त प्रांतपाल जयेश पटेल यांनी रोटरीच्या सेवा प्रकल्पांची माहीती दिली .शंकरशेट साबळे नेत्र रुग्णालयाचे सुधीर सुधाळ यांनी सोलापूराती नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीरात झालेल्या मेतीबिंदू शस्त्रकिया यांची सविस्तर माहिती दिली .एस टी चे शितल बिराजदार यांनी मार्गदर्शन केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर चे असिफ मुलाणी यांनी सर्वांनी मिळून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीराचे आयोजन अतिशय चांगल्या पध्दतीचे केले आहे भविष्यात ट्रान्सपोर्ट असोशिएशन व सर्व संस्था मिळून चालकांसाठी मोठे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करावे व या शिबीरात सर्व चालक वाहक कार्मचारी यांना चष्मा प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने भेट देण्यात येणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमात सुत्रसंचलन रोटरी सोलापूर चे पार्थ दावडा यांनी केले कार्यकम यशस्वी करण्याकरीता बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, सचिन मोरे, बसवराज अंटद, रोटरी चे सचिव निलेश फोफलिया, सदस्य डॉ राजीव मोहोळकर, शांता येळंबकर, मकरंद बसवंती, संतोष काणेकर, संजय मडूर, बालाप्रसाद मुंदडा, विशाल वर्मा, संगिता गुंडयाल तसेच एस टी विभागाचे कांबळे तसेच शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय चे महेश पवार, सिंधु सुरवसे मॅडम यांनी परिश्रम घेतले
