महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझं थेट आवाहन आहे. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी, कुठेही एक दमडी देखील अनकाऊंटेड आहे का ते पाहावे, असे चॅलेंजच सामाजिका कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे प्रकरणात केलेल्या आरोपावरन दिले आहे. इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार? राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना? योग्य आहे हे? असा सवालही दमानिया यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
दोघांनाही माझी विनंती, माझी ताबडतोब चौकशी करावी, माझ्या सगळ्या बँक खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे, मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी, अशा शब्दात अंजली दमानिया यांनी गृहमंत्र्यांना टॅग करुन आपली बाजू मांडली आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरच चव्हाण यांनी नाव घेता ट्विट करुन अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केल होते. रिचार्जवाल्या ताईंना 25 खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आल्याचे सूरज चव्हाण यांनी म्हटले होते. त्यावरुन, अंजली दमानियांनी आता थेट गृहमंत्र्यांना चॅलेंज देत तपास करण्याची मागणी केली आहे.