सोलापूर : सोलापूर येथील कामतकर क्लासेसचा बक्षीस वितरण समांरभ नुकताच पार पडला. पुण्यातील प्रा. डॉ. सुनील धनगर यांच्या शुभहस्ते हिराचंद नेमचंद वाचनालय येथे कार्यक्रम पार पडला.
यावेळी शहरातील प्रथम आलेला व कामतकर क्लासेसमध्ये प्रथम आलेला आदित्य कामतकर १०० टक्के गुण मिळविलेला विद्यार्थी याचा पुणेरी पगडी आणि हार घालून सत्कार करण्यात आला. तन्मय जाधव दमाणी प्रशालेत दुसरा, अथर्व खोत दमाणीत प्रशालेत तिसरा, अथर्व आमले सुयश शाळेत प्रथम, महाश्री माने सुयश शाळेत तृतीय, आर्या बनकर श्राविका शाळेत प्रथम, श्रेया कांबळे श्राविका शाळेत दुसरी असे जास्त गुण मिळवलेल्या ४५ विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. इ. ५वी स्कॉलरशीपप्राप्त १६ विद्यार्थ्यांचा तसेच ८वी स्कॉलरशीप प्राप्त २२ विद्यार्थ्यांचा व टॅलेंट सर्च परीक्षेसोबतच बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना क्लासचे संचालक सुनील कामतकर यांनी केली. दहावी विद्यार्थांची लिस्ट सुखदा कामतकर, अनुजा जोशी, सुरज हलकुडे, प्राजक्ता कुलकर्णी यांनी वाचली. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेदपाठक, तर आभार कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंत तावशे, नीलेश गायकवाड, श्रीकांत चिप्पा, ईशान जोशी, श्रेयस राजोपाध्ये, संतोष पुजारी, कुलकर्णी काका, राजू हिरेमठ यांनी मेहनत घेतली.