No Result
View All Result
- निवडणूक आयोगाने एक निर्णय दिला आहे ज्यानुसार शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी शनिवारीही मातोश्रीच्या बाहेर येऊन आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं. त्यानंतर आता आज खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर एक गंभीर आरोप केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हे ट्विट केलं आहे.
- काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.
No Result
View All Result