सोलापूर,दि.21: विधानपरिषदेचे आमदार अरूण लाड यांच्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्याला कोरोना काळात 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा वापर आवश्यक ठिकाणी करण्याच्या सूचना शंभरकर यांनी दिल्या. जिल्ह्यातील करकंब ग्रामीण रूग्णालयाला दोन, मंद्रुप ग्रामीण रूग्णालय दोन, वडाळा ग्रामीण रूग्णालय दोन, मोहोळ ग्रामीण रूग्णालय दोन, अक्कलकोट ग्रामीण रूग्णालय तीन, नातेपुते ग्रामीण रूग्णालय दोन आणि शेटफळ ग्रामीण रूग्णालयाला दोन अशी 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात येणार आहेत.
