सोलापूर : शहराचा बुधवार दिनांक १६ जून चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासात नवीन १४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे . या कालावधीत २१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू ओढवला आहे. गळफास घेऊन मृत्यू झालेल्या लष्कर परिसरातील ४९ वर्षांच्या महिलेस पोस्टमार्टेमनंतर कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापुरातील आता केवळ १६२ रुग्ण कोरोनावर रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक ६ रुग्ण सापडले आहेत.