सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत, आज राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची अनोखी कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन सोलापूर महानगरपालिका आणि इको गणेशयुग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यशाळेत शहरातील विविध शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांनी पावसातदेखील उत्साहाने सहभाग घेतला.


सदर कार्यशाळेचे उदघाटन मा. उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केले. त्यांनी भविष्यातील सर्व उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेचे प्रशिक्षक विकास गोसावी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडविण्याचे कौशल्य शिकवले. साधारण तीन तासांच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि सुंदर गणेश मूर्ती साकारल्या. विशेष म्हणजे, ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत होती.

या कार्यशाळेचे प्रमुख संयोजन अक्षय मोरे (पर्यावरण संवर्धन अधिकारी), स्वप्नील सोलनकर (पर्यावरण व्यवस्थापक) तसेच गणेशयुगच्या आसावरी गांधी, सोनाली वाघमोडे व बांबेरे, लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुमिशा शाह यांनी केले, तर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल यशस्वी ठरले आहे.