मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे.
दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. तर राज्यातील 43 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे. तर राज्यातील 29.74 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. याशिवाय राज्यातील 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के मार्क मिळाले आहेत.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. याशिवाय यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 3.82 टक्क्यांनी अधिक लागला आहे. यावर्षी 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 92.05 टक्के आहे.