दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली असून सोलापूर जिल्ह्यातील १८४ केंद्रांवर ६५ हजार ५८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान ही परीक्षा होणार असून १८५ केंद्रांवर नियोजन केले आहे. त्यापैकी १३३ संवेदनशील केंद्रे असून त्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे


परीक्षा केंद्रांवर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब देऊन त्यांचे स्वागत केले. संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार असून गैरप्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुख्य म्हणजे सामुहिक कॉपीचे गैरप्रकार आढळल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेवर ही कारवाई करण्यात येणार आहे.