- माहितीच्या अधिकाराखाली मिळाली धक्कादायक माहिती
- JNNURM च्या २०० बसेस पैकी ५६ बसेस ????झाल्या गायब आणि ₹.१३ कोटी १७ लाख ४८ हजार ५२६ रुपयांचा महाघोटाळा उघडकीस
सोलापूर : गिरिकर्णिका फाऊंडेशन ही संस्था सोलापूरच्या पर्यावरण आणि शहर विकासाच्या दृष्टीने स्थापन झालेली संस्था असून, संस्थेमार्फत #MissionSolapur38Degree2030 आणि #SaveSolapur सिटीझन फोरम हे दोन अत्यंत नियोजनबद्ध प्रकल्प यशस्वीपणे चालवले जात आहे. नुकत्याच मी सर्व सोलापूरकरांच्या वतीने २३ जानेवारी २०२० रोजी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना आॅनलाईन माहितीच्या अधिकाराखाली सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभांगा अंतर्गत येणाऱ्या सेवांविषयक जनतेला पडणार्या प्रश्नांची मिहिती मागवली.
सोलापूर महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या परिवहन सेवा विषयी मी एकुण तीन प्रश्न विचारले होते, १)JNNURM अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन खात्यात दाखल झालेल्या २०० बसेस ची एकुण किंमत कीती? २)JNNURM अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन खात्यात दाखल झालेल्या २०० बसेसची सद्य स्थिती काय आहे.सदर बसेस दुरुस्त करुन रस्तावर धावण्यास काय अडचणी आहेत? ३)केंद्र सरकारच्या National Electric Mobility Mission Plan अंतर्गत इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहे आणि त्या बसची पर युनिट किंमत कीती, तथा सदर बस खरेदीची सोलापूर महानगरपालिकेने प्रक्रियेची सुरुवात केली आहे का?
०६ फेब्रुवारी रोजी मला दिनांक ०५/०२/२०२० रोजी चे सो.म.पा.परिवहन व्यवस्थापकांचे कार्यालय जा.क्र./पव्य/कर्म/१२५४ चे पत्र प्राप्त झाले ज्यात मी विचारलेल्या माहितीचा खुलासा मिळाला. त्याची प्रत ह्या पोस्ट समवेत जोडत आहे, ती आवश्य पाहावी. २४ सप्टेंबर २०१३ रोजी केंद्र सरकारच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची प्रत ही या पोस्ट समवेत जोडत आहे. त्यात स्पष्ट नमूद आहे की JNNURM अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन बस सेवेस २०० बसेस मंजूर झाल्या ज्यांची किंमत ₹.८५ कोटी ८० लाख इतकी आहे.मला माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार सोलापूर महानगरपालिकेला JNNURM अंतर्गत १४४ बसेसच प्राप्त झाले ज्यांची किंमत ₹.७२ कोटी ६२ लाख ५१ हजार ४७४ इतकी आहे. आता साहजिकच प्रश्न समोर उपस्थित होतो की ५६ बसेस आणि ₹.१३ कोटी १७ लाख ४८ हजार ५२६ रुपये गेले कोणीकडे. सदरचे प्रकरण मी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना संपूर्ण पुराव्यानिशी निवेदनाद्वारे आणि पंतप्रधान कार्यालयाला अॉनलाईन पोर्टल द्वारे निदर्शनास आणून दिले आहे.
विचार करा, ८६ कोटी च्या बस खरेदीत, ५६ बसेस आणि १३ कोटींचा हिशोब लागत नाहीये, तर ३००० कोटी रुपयांच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काय काय पाहावे लागेल. JNNURM अंतर्गत खरेदी केलेल्या बसेस फक्त ६ वर्षांच्या अवधीत सो.म.पा.च्या परिवहन खात्याच्या बस डेपो मध्ये अक्षरशः भंगार आणि न पाहावेल अश्या अवस्था मोडकळीस पडून आहेत. त्या बसेसची कोणालाच काही पर्वा कशी काय नाही देवच जाणे.कहर म्हणजे अशोक लेलॅन्ड कंपनी ने सोलापूर महानगरपालिके विरुध्द मुंबई च्या कंपनी लवादात केस दाखल करुन सोलापूर महानगरपालिकेला ह्याच बसेसच्या थकीत रक्कमेपोटी ₹.३० कोटी रुपयांची व्याजासकट मागणी केली आहे.आपल्या सोलापूरकरांचे नशीब की २५ इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची योजना आम्ही दाखवलेल्या सतर्कतेमुळे म.न.पा.ला थांबवावी लागली, नाहीतर त्या बसेसची देखिल अवस्था अशीच झाली असती.