सोलापूर: सोलापूरच्या पालकमंत्री अवघ्या तीन महिन्यातच बदलला आहे .दिलीप वळसे -पाटील यांचे पद काढून घेऊन राष्ट्रवादीने आता जितेंद्र आव्हाड यांना सोलापूरचे पालकमंत्रिपद दिले आहे येस न्यूज मराठी देखील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री सोलापूरकर दुर्लक्ष करीत असल्याचा विशेष वृत्तांत प्रसिद्ध केला होता. शिवाय सोलापूरचे पालकमंत्री तातडीने बदलावा अशी मागणी देखील काही ठिकाणावरून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांचे पद काढून घेण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. दिलीप वळसे-पाटील हे नियुक्ती झाल्यानंतर 26 जानेवारी रोजी सोलापुरात आले होते त्याच दिवशी त्यांनी डीपीडीसी ची बैठक घेतली दर महिन्याला सोलापूरला दोन दिवस येणार असे त्यांनी ठासून सांगितलं होतं .मंत्रालय पातळीवर मी सर्व प्रश्न सोडवणार असेही त्यांनी सांगितले मात्र नियुक्ती झाल्यापासून त्यांनी सोलापूर कडे पाठ फिरवली .
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असताना सोलापूरचे अनेक प्रश्न मंत्रालय पातळीवर प्रलंबित आहेत असे असताना पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे दोनच दिवसापूर्वी येस न्यूज मराठीने सोलापूरचे पालकमंत्री आहेत तरी कोठे ?असा सवाल करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे आज दोनच दिवसात सोलापूरच्या पालकमंत्री बदलला आहे . 31 मार्च रोजी शासनाने आदेश काढून सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केले आहे . त्यामुळे दिलीप वळसे-पाटील यांची भाषणबाजी आणि दमबाजी अवघ्या दोनच बैठकांमध्ये सोलापूरकरांना पाहायला मिळाली. कोरोना सारखी युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी आता सोलापूरचे नवे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तातडीनं सोलापूरला येऊन सर्व प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्याची गरज आहे