सोलापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे अर्थात एसटीचे आरक्षण मिळावे तसेच अनुसूचित जमातीच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू कराव्यात या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करुन ही शासन याची दखल घेत नाही.त्यामुळे शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी पासून सर्वत्र धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय आता धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आला असून आ.गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात ही आता ढोल बाजावो सरकार जगावो हे आंदोलन करण्यात येणार असल्याची धनगर समाजाच्या वतने देण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाला न्याय देण्यात सरकार अपयशी ठरत आहे.केवळ निवडणूका आल्या की समाजाची आठवण सत्ताधार्यांना होत आहे.त्यामुळे आता सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी आणि झोपलेल्या सत्ताधार्यांना जागे करण्यासाठी ढोल बजावो आंदोलन करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी हुतात्मा चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन हे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.यावेळी धनगर समाजाचे प्रतिक असणारे पारंपारिक गजी ढोल वाजवत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे.त्यामुळे समाज बांधवांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन शरणु हांडे, सतिश बुजरुक्के, श्रीधर सोनटकले, धनराज जानकर, राम वाकसे, शिवानंद पुजारी, लक्ष्मण तरंगे, अप्पा नरे, शंकर बंडगर, सागर सुरवसे यांनी केले आहे तसेच यावेळी सुरेश पाटील, चेतन नरोटे, अर्जून सलगर, नरेंद्र काळे, अरुणा वाकसे, सिध्दारुगढ बेडगनूर, विलास पाटील, सुरेश कोकटनूर, प्रा. देवेंद्र मदने, निर्मताई पाटील, निमिशा वाघमोडे, यलगोंडा सातपुते, जग्गनाथ पैकेकरी, विक्रम ढोणे आदीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.