सोलापूर : शहरातील 18 व्यक्तीवर मास्क घातले नसलेमुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली होती तर आज एकूण 52 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. एकूण 9 हजार 650 रुपये दंड वसुल करण्यात आला.
सोलापूर शहरात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त दिपक तावरे शहरातील किराणा दुकानदार,चार चाकी गाडीवरील भाजी विक्रेते,व ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणच्या व्यापारी बंधूंनी मास्क व ग्लोज घालणे बाबतआदेश पारीत केले आहेत.जे व्यापारी आदेशाचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार ज्या विक्रेत्यांनी मास्क लावले नाहीत अशा 53 विक्रेत्यांवर वेगवेगळ्या विभागीय कार्यालया कडील आरोग्य निरिक्षका मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
- झोन क्र 1 सहा व्यक्ती 1000 रु दंड वसुल
- झोन क्र 2 चोवीस व्यक्ती 3300हरु दंड
- झोन क्र 5 अकरा व्यक्ती 1400 रु दंड
- झोन क्र 6 एक व्यक्ती 150 रु दंड,
- झोन क्र 7 तीन व्यक्ती 300रु दंड,
- झोन क्र 8 आठ व्यक्ती 3300रु दंड,
असे आज दि.२६/०५/२०२०रोजी रक्कम रुपये 9650/-इतका दंड वसुल करण्यात आला. जे लाेक आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांचेवर अत्यंत कडक कारवाई करणेबाबत आदेश देणेत आले आहेत.