मोहोळ/दादासाहेब गायकवाड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कामती बुद्रुक ता मोहोळ येथील रूपालीताई चाकणकर युवा मंचच्या वतीने आशा वर्कर व अंगणवाडी सेविका तसेच कोविड योध्दा म्हणून काम करणाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी फिजिकल डीस्टंशिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
यावेळी रुपाली ताई चाकणकर युवा मंचचे अध्यक्ष सारंग गायकवाड, पो कॉ कविता पाटील, ऍड किरण सराटे, यशवंत बाबरे, मनोज गायकवाड, सचिन गायकवाड, शरद गायकवाड, अमोल ओहाळे, रमेश गायकवाड, अमोल जगताप, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.