मोहोळ/दादासाहेब गायकवाड : रविवार दि.३१ मे रोजी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने मोहोळ येथे जिल्हाध्यक्ष पैलवान अनंता नागणकेरी यांच्या ” लोकशाही ” या निवासस्थानी कणखर कर्मयोगिनी, दूरदर्शी नेतृत्व कौशल्य, उत्तम प्रशासक, रणरागिणी, प्रजापालक वीरांगना महाराणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, निवृत्त पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर हजारे, नायब तहसीलदार संजय राठोड यांच्या हस्ते मूर्तिपूजन करण्यात आले तर गुन्हे तपासणी शाखेचे पोहेकॉ शरद ढावरे, गणेश दळवी यांच्या हस्ते मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी धनगर समाजाचे जेष्ठ नेते रामचंद्र दाजी खांडेकर, झुंबर वाघमोडे, विक्रांत (आबा ) चेंडगे, रामेश्वर कोळेकर, सुनील शिंदे, माणिक (आण्णा ) आवारे, शाम (आण्णा ) नागणकेरी, पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष तात्या पाटील, पत्रकार बापूसाहेब काळे, सूरज शिंदे, अतीश नागकेरी, आशिष नागणकेरी, कामती बुद्रुकचे नेते तायप्पा गावडे, नामदेव नरुटे, अक्षत नरुटे आदी समाज बांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स पाळून अभिवादन केले.