सोलापूर(प्रतिनिधी):- सरकारच्या बेटी बचाव – बेटी पढाव या अभियानात सहभाग म्हणून बॅक ऑफ इंडियाने खारीचा वाटा उचलला आहे. बॅकेकडून देण्यात येत असलेल्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून मुलींनी संगणक साक्षर झाले पाहिजे असे प्रतिपादन बॅक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेंजर रमेशचंद्र ठाकूर यांनी केले. बॅकेने सीएसआर फंडातून सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 14 संगणक संच भेट दिले त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे. त्यात मुलींनी आधुनिक शिक्षणात अग्रेसर असले पाहिजे बॅक ऑफ इंडियाकडून देण्यात येत असलेल्या सर्व संगणकाचा उपयोग मुलींनी त्यांच्या आधुनिक ज्ञान वाढीसाठी करावा असेही रमेशचंद्र ठाकूर यांनी सांगितले.
बॅक ऑफ इंडियाने नेहमी सामाजिक जबाबदारी पार पाडत ग्राहकांचे हित जोपासले तसेच सर्व सामान्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या शाळां आधुनिक शिक्षणाचे केंद्र व्हावे म्हणूनच बॅकेने संगणक भेट दिले आहेत असे आपल्या मनोगतामधून बॅक ऑफ इंडिया सोलापूरचे विभागागिय महाव्यवस्थापक अजय कडू यांनी सांगितले.
बॅक ऑफ इंडियाला आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मदतीसाठी आवाहन केले त्यानुसार बॅकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ 14 संगणक भेट दिले त्यातून बॅक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांची सामाजिक जाण किती तत्पर आहे हे दिसून आले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी महेश आवताडे यांनी केले.
प्रारंभी बॅक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिनकुमार यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर बॅकेकडून 14 संगणक संच सोलापूर जिल्हा परिषदेला भेट देण्यात आले. यावेळी सोलापूर विभागागिय उपमहाव्यवस्थापक रामबाबू बल्ला, लग्नजीत दास, अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिकर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय राठोड, उपलेखाधिकारी उत्तम सुर्वे, अमित सलगर, बॅक ऑफ इंडिया वरिष्ठ व्यवस्थापक घनश्याम गुलेच्छा यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.