येस न्युज मराठी नेटवर्क : भारताचा प्रजासत्ताक दिन रविवारी उत्साहात साजरा झाला. या धामधुमीत दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेलं एक कार्टून व्हायरल होत आहे. राज ठाकरे यांनी मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी हे व्यंगचित्र रेखाटलं होतं. मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करणारं हे व्यंगचित्र आज व्हायरल झालं कारण त्यांनी आता आपल्याच धोरणांपासून यु टर्न घेतला आहे.
गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिने रेखाटलेल्या या व्यंगचित्रात प्रजासत्ताकाला सुळावर चढवणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचं चित्र रंगवलं होतं. तेव्हा राज ठाकरे यांनी मोदींच्या धोरणांना खूप विरोध केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज यांनी पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलून भगवा केला आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली. हे अधिवेशन आणि त्यानंतरची मनसेची भूमिका यावरची चर्चा ताजी असल्याने आजच्या प्रजासत्ताक दिनी हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. यंदा राज कोणतं व्यंगचित्र रेखाटणार असा खोचक सवालही काहींनी हे व्यंगचित्र पोस्ट करत केला होता.