सुरेश पाटील, जगदीश पाटील आणि आप्पासाहेब पाटील तिघे एकत्र व्यासपीठावर आल्याने चर्चेला उधाण
सोलापूर : प्रभाग क्रमांक तीन अ येथील नगरसेवक सुरेश पाटील यांनी सुचविलेल्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हास्तर या अनुदानातून घोंगडे बंगला ते रेवंमा पाटील मंगल कार्यालय ते आनंदकर घर ते कोळगिरी घरापर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन समारंभ मोठ्या थाटात करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील नगरसेवक नागेश वल्याळ उद्योगपती सुरेश बिद्री आप्पासाहेब बाळू पाटील सीएस कोळी प्रवीण भतडा राजू कटारे बोरा सर दीपक तापडिया सुनील लामकाने शशिकांत मल्हारी राजेश कतारी मनोज पवार बिपिन पाटील संजय पुजारीआदींच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत पूजनाने हा भूमिपूजन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी बिपीन पाटील यांनी केले. सुरेश पाटलांना दीर्घ काळाचा अनुभव आहे विकास निधी खेचून आणण्यात त्यांचा नेहमी प्रयत्न असतो सोलापूर शहराच्या विकासाबरोबरच त्यांनी प्रभागाचा विकास केला असे मनोगत यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी व्यक्त केलं. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरेश पाटील हे नेहमी अग्रेसर असतात प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी कधीही राजकारण केले नाही प्रभागाचा विकास हाच आपला ध्यास असे त्यांचे कार्य असल्याचे मनोगत यावेळी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी व्यक्त केलं स्टॉप प्रभागातील नागरिक कोणत्याही मूलभूत सुविधा पासून वंचित राहू नये यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असतो जास्तीत जास्त निधी कसा प्रभागात आणता येईल यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केला अजून देखील या प्रभागात अनेक विकासकामे करायचे आहेत त्या कामासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे मनोगत यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमाचे संयोजन शिवराणा प्रतिष्ठान कतारी समाज चारीटेबल ट्रस्ट यांनी केले होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय कोळी संजय पुजारी राजेश कतारी मित्रपरिवार आणि सुरेश आण्णा पाटील मित्र परिवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.