नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे 58 लाख लोकांना ग्रासलं आहे. तर सुमारे 92 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 47 लाख जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 86 हजार 52 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 1 हजार 141 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 58 लाख 18 हजार 571 एवढा झाला आहे. देशात सध्या 9 लाख 70 हजार 116 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 92 हजार 290 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 46 लाख 74 हजार 988 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाने हाहाकार सुरूच आहे. जगभरात सुमारे 200 पेक्षा जास्त देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3 कोटी 21 लाखांच्या पार गेला आहे. तर 9 लाख 71 हजार जणांना कोरोनाने जीव घेतला आहे. तर 2 कोटी 17 लाख जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.