शहर प्रतिनिधी
सोलापूर, दि. 10 जानेवारी
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेची शाखा आणि सोलापूरच्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 12 जानेवारी दुपारी दीड वाजता दत्त चौकातील संस्था सभागृहात मोफत वधू-वर पालक परिचयमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याची सुरवात विज्ञाननिष्ठ ज्योतिषी ज्योतीषपंडीत डॉ.सुधीर दाते यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात वधू वरांसह पालकांचाही परिचय मेळावा होणार आहे. मेळाव्यात “वधू – वर कुंंडली मिलन’ या विषयांवर डॉ. दाते यांंचे मार्गदर्शन होणार आहे.
मेळाव्यात अडीच हजार वधू व वरांच्या स्थळांची माहीती असलेला “जोडी तुझी माझी’ हा 2019 चा दिवाळी अंक विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या मेळाव्यात योग्य शूल्कासह नूतन नोंदणीची सोयही करण्यात आली आहे. शहर व परिसरातील वधू – वरांसह त्यांंच्या पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन कोथरूड संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम कुलकर्णी व सोलापूर संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 09689790105 किंवा 7447788349 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.