सोलापूर : डफरीन चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे डफरीन चौकाची दयनीय अवस्था सुरू आहे. दोन दिवसापूर्वी या चौकातील दोन खड्डे डागडुजी करून बुजवण्यात आले मात्र नव्याने भला मोठा खड्डा पाडून तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा वाहतुकीची कोंडी सुरू झाली आहे एक तर हत्ती छाप स्पीड ब्रेकरमुळे या चौकात वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे शिवाय सिग्नल यंत्रणा देखील सदोष आहे .रस्ते लहान आणि फुटपाथ मोठे केल्यामुळे या चौकातील नियोजन बिघडले आहे .स्मार्ट सिटी चे सीईओ असीम गुप्ता यांनी या कामात झालेल्या चुका दुरुस्त करा असा आदेश दिले. शिवाय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी देखील डफरीन चौकात मनपा अधिकारी तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ते नीट करा ,चौक व्यवस्थित करा असे सांगितले. मात्र त्याला महिना उलटला तरीही याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नसून स्मार्ट सिटीच्या सर्वच कामांची अशी बोंब सुरू आहे.