- सोलापूर सायकल क्लब चा उपक्रम
सोलापूर : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूरात प्रथमच महिलांचे आरोग्य अबादित राहावे आणि त्यांना सायकलींग ची आवड निर्माण व्हावी या साठी सायकल क्लब ने हिरकणी सायकल राईड चे आयोजन केले होते यामध्ये सोलापूरातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.
सदर हिरकणी राईड, आमदार प्रणिती ताई शिंदे, उपायुक्त डॉ वैशाली कडुकर, नंदिनी अंकुश शिंदे, प्रज्ञा पाटील, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या हस्ते चार पुतळा येथे अहिल्या बाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सायकल राईड ला झेंडा दाखवण्यात आला. सदर हिरणकी राईड ला मुख्य प्रायोजक म्हणून धूत सारी, सोलापूर आणि सहप्रायोजक म्हणून संप्रति प्रेस, विमल सेल्स, झाड बॅग मॉल, इको फ्रेंडली बॅग, ज्ञानदीप कॉम्पुटर यांचे सहकार्य लाभले. राईड साठी अबुलन्स ची सेवा सीएनएस हॉस्पिटल कडून मोफत उपलब्ध करून देण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त सोलापुरात प्रथमच खास महिलांसाठी मोफत हिरकणी सायकल राईड चे आयोजन सायकलिस्ट फौंडेशन च्या सोलापूर सायकल क्लब च्या वतीने करण्यात आले. सदर राईड मध्ये सहभागी 300 महिला सायकल स्वारांना मोफत गुलाबी टी शर्ट, टोपी, मेडल, प्रमाणपत्र आणि नाष्टा प्रदान करण्यात आले.
सदर राईड चा मार्ग चार पुतळा – डफरीन चौक – रंगभवन चौक – सात रास्ता – पत्रकार भवन – मसिहा चौक – सात रस्ता – डफरीन चौक – सरस्वती चौक – आणि समारोप चार पुतळा येथे झाला. सदर राईड ही 8 किलोमीटर ची होती, राईड झाल्यानंतर धूत सारीज मार्फत सहभागी 300 हिरकणी सायकल स्वारांसाठी तीन लकी ड्रा मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आले, विजेत्यांना धूत सारीज तर्फे प्रथम पारितोषिक म्हणून पैठणी देण्यात आली. विजेत्या लकी ड्रॉ नावे प्रथम सौ. प्रतिभा पवार, द्वितीय सौ. निलिमा हुमनाबादकर आणि तृतीय सुप्रिया सपाटे. सदर कार्यक्रमात आ. प्रणिती शिंदे, डॉ वैशाली कडुकर आणि सौ. नंदिनी अंकुश शिंदे यांनी सायकलींग चे आरोग्यासाठी असलेले महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
सदर राईड साठी महिला समन्वयक म्हणून सौ. स्वाती भोसले, सौ. अनुजा तारे तसेच सोलापूर सायकल क्लब चे पदाधिकारी प्रा. सारंग तारे, अमेय केत, भाऊराव भोसले, महेश बिराजदार, डॉ प्रवीण ननवरे, शीतल कोठारी, आदित्य बालगांवकर, बाहुबली शहा, अविनाश देवाडकर, आनंद हुलगेरी, अक्षयकुमार चिंता, गणेश शिलेदार यांनी परिश्रम घेतले आणि सदर राईड चे फोटोग्राफी करण्यासाठी चेतन लिगाडे, अभिषेक दूलंगे, आयेशा शेख, श्रद्धा सक्करगी, रजनीकांत जाधव यांचे सहकार्य लाभले.