मुंबई : पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या मोर्चाला सुरूवात होत आहे. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुंटुंब मोर्चा सहभागी होणार आहेत. मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकही या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले असून, हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होईल. त्यानंतर आझाद मैदानात राज ठाकरे यांच्या भाषणानं मोर्चाचा समारोप होणार आहे.
- “चले जाव”; घुसखोरांविरुद्धच्या ‘मनसे’च्या मोर्चाला सुरूवात
- राज्यभरातून हजारो मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल
- राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुंटुंब मोर्चात सहभागी
- हिंदू जिमखाना येथून झाली मोर्चाला सुरूवात
- हिंदू जिमखाना परिसरा भगव्या रंगानं फुलून गेला आहे
- आझाद मैदानात राज ठाकरे यांच्या भाषणानं मोर्चाचा समारोप होणार
- मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील अशी चर्चा
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन यांनी पुन्हा मनसेत घरवापसी
- राज ठाकरे यांनी पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध ठाम भूमिका