सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे दिवंगत व्हा. चेअरमन काशिनाथ भरमशेट्टी यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त हन्नूर येथे आयोजित शिबिरात २२१ जणांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा हेल्मेट भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या शिबिराचे उद्घाटन शिवानंद पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती सुनंदा गायकवाड होत्या. यावेळी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड, व्यंकट पोरे, संयोजक विश्वनाथ भरमशेट्टी, डॉ. नेहा भरपशेट्टी, क्रांती दर्गोपाटील, धानप्पा हंडगे, हमीद पोरजादे, यसवराज बाणेगाव, संजय द्याणेगाव, राजकुमार भरमशेट्टी, गुरुनाथ परतनाळे, अशपाक अगसापुरे, सिद्धाराम भंडारकवठे, मुलूक सगरी, दिलीप ब्रिराजदार, दिलीप काजळे, राजशेखर मसुती, दिलीप काजळे, अभूजर पाटील उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत कस्तुरे, बाबुराव कराळे, प्रकाश बिराजदार, प्रा. नीलेश भरपशेट्टी, श्रीशैल भरमशेट्टी, सागर दर्गोपाटील, बस मांदे. निलप्पा घोडके. चंद्रकांत जंगले गुरूजी, सोपान निकते, चंद्रकांत गोट्टे, चंद्रकांत सैदे, अप्पाशा हताळे, बसवणप्या सुतार, विठ्ठल मोकाशी, गोटू मंगरुळे, विश्वनाथ भोसले, इरण्णा परतनाळे, शैलेश पाटोल उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनिल बिडवे, विश्वनाथ ब्रिराजदार, परशुराम खाळशंकर, निरंजन हेगडे, शिवा गवळी, सिध्दप्पा पुजारी, त्रिमुख बाळशंकर, गौरीशंकर भरमशेट्टी, लायकअली नदाफ, शिवण्या फसगे, मतोज भरपशेट्टी व के. बी. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच जुळे सोलापुरात सिटी जिम याठिकाणी भरमशेट्टी परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदार शिबिराला देखील मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी उपमहापौर राजेश काळे, चंद्रकांत कस्तुरे, प्रकाश बिराजदार, शिवाजी सुरवसे, विश्वनाथ भरमशेट्टी यांच्यासह भरमशेट्टी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.